भारतमातेने जेवू घातले त्याची गोष्ट
भारतमातेची व्याख्या आपण अशी करतो की, भारत हीच माता. हे काही प्रमाणात खरे असेल. देश हीच माता. पण खरे तर ते उलट आहे. माता म्हणजेच भारत. त्या ज्या सगळ्या आमच्या माता आहेत- कुणी नवरा असलेल्या, कुणी नसलेल्या, कुणी मुलाबाळांतल्या, कुणी एकट्या, कुणी घरातल्या, कुणी घर सोडलेल्या- त्या म्हणजेच भारत. देश म्हणजे माता असेल; पण खरं तर जे मातृतत्त्व आहे, ते म्हणजेच देश!.......